PM Suryoday Yojana Saam Tv
देश विदेश

PM Suryoday Yojana: श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर PM मोदींची मोठी घोषणा; १ कोटी लोकांना मिळणार गिफ्ट

PM Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यातून परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्योदय योजनेची घोषणा केलीय. या योजनेअंतर्गंत एक कोटी घरांच्या छतावर सोलर बसवण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

PM Modi launched Pradhan Mantri Suryoday Yojana :

अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन योजना लागू केलीय. देशातील नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर सिस्टीम असावी असा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला होता, त्यांचा हा संकल्प पूर्ण होऊ लागलाय. आज पंतप्रधान मोदींनी एक कोटी लोकांच्या घरांना रुफटॉप सोलर बसवण्याची योजना सुरू केलीय. (Latest News)

पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना सांगितलं की, जगातील सर्व राम भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या रुपातून नेहमी ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प अधिक दृढ झालाय की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. अयोध्येतून परतल्यानंतर आमचे सरकार “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करेल. या योजनेतून देशातील १ कोटी घरांच्या छतावर सोलर बसविण्याचे ध्येय समोर ठेवले आहे . या योजनेमुळे गरिब आणि मध्यमवर्गीय लोकांचा विजेचा प्रश्न सुटेल आणि भारत देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्यामध्ये भव्य राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठेला एक नव्या युगाचा प्रारंभ झाल्याचं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. नागरिकांनी पुढील १००० वर्षांपर्यंत मजबूत, भव्य आणि दिव्य भारत तयार करावा असं आवाहनदेखील मोदींनी केलं. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी 'सियावर रामचंद्र की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा देत लोकांना संबोधित करताना हा केवळ विजयाचा नाही तर नम्रतेचा क्षण असल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लग्नाच्या १० महिन्यांत १० दिवसही खूश नाही, मी आयुष्य..' VIDEO तयार करून विवाहितेनं आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल

Skin care : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तज्ज्ञांच्या या सवयी ठरतील उपयोगी

Soyabean Chilli Recipe: गोड खाऊन कंटाळा आला? बनवा चमचमीत सोयाबीन चिली, अगदी १५ मिनिटांत बनेल

Maharashtra Live News Update : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाची चव्हाट्यावर

GK: भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे वेगवगेळ्या भाषा बोलल्या जातात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT