PM Modi in Rozgar Mela Saam Tv
देश विदेश

PM Modi in Rozgar Mela: पंतप्रधान मोदींनी 71 हजार तरुणांना वाटले ऑफर लेटर! म्हणाले, हे तुमच्या मेहनतीचं फळं

Job Opportunity : देशभरातील ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कोमल दामुद्रे

Naukri Bharti : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रोजगार मेळाव्यात 71 हजार तरुणांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. देशभरातील ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग होतील.

नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर त्यांना तरुणांना (Youth) संबोधित केले. ते म्हणाले की, भारत सरकारच्या विविध विभांगामध्ये ७० हजारांपेक्षा अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तुम्हाला तुमच्या कामाचे व मेहनतीचे यश (Success) मिळाले आहे. मी तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. असे मोदींनी सांगितले.

तसेच गेल्या ९ वर्षात, भारत सरकारने सरकारी नोकरीला अधिक पारदर्शक व व जलद प्रक्रिया होतील असे बनवण्यास प्राधान्य दिले आहे. अर्ज करण्यापासून ते निकाल लागण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन (Online) करण्यात आली आहे.

1. १० लाख लोकांना नोकरी देण्याची घोषणा

मागच्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात सगळे सरकारी पदे भरुन १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशातील विविध विभागांमध्ये 71 हजार युवकांची भरती करण्यात येत आहे.

2. कोणत्या विभागात नोकरी मिळेल

भारतीय डाक सेवा, पोस्टल निरीक्षक, कमर्शियल-कम-तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी, निम्न विभाग लिपिक, उपविभाग अधिकारी, कर सहाय्यक, यासाठी नवीन कर्मचारी निवडण्यात येतील.

तसेच निरीक्षक, नर्सिंग क्षेत्र, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, फायरमन, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, विभागीय लेखापाल, लेखा परीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक कमांडंट, मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहायक निबंधक, सहायक प्राध्यापक अशा अनेक पदांवर भरती केली जाणार आहे.

3. विशेष उपक्रम

मोदींनी म्हटले की, हा रोजगार मेळावा घेण्यामागचा उद्देश असा की, मागच्या काही काळात तरुण बेरोजगार झाले होते. येणाऱ्या काही वर्षात त्यांचे भविष्य उज्जवल असेल असे केंद्र सरकारला वाटते. तसेच तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यातून संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT