Prime Minister Narendra Modi Disscussing With Goa CM Pramod Sawant On Results Of Assembly Election Saam Tv
देश विदेश

गाेवेकरांवर PM Modi खूष; प्रमाेद सावंतांच्या भेटीत माेदींनी दिलं हे वचन

गाेवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच भाजप पदाधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींची भेट घेतली.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : गाेवा विधानसभा निवडणुकीत (goa assembly election) घवघवीत यश मिळविल्यानंतर गाेव्याच्या (goa) भाजप (bjp) पदाधिका-यांसह मुख्यमंत्री प्रमाेद सावंत (Pramod Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पंतप्रधान माेदींनी यांनी भापजला पुन्हा गाेव्यात सेवेची संधी दिल्याने गाेवेकरांचे आभार मानले आहेत. दाेन्ही नेत्यांनी (narendra modi) ट्विट (tweet) करुन या भेटीची माहिती गाेवेकरांपर्यंत पाेहचवली आहे. (Goa Latest Marathi News)

गाेवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गतवेळ पेक्षा यंदा सात अधिक जागा जिंकल्या. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री प्रमाेद सावंत आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत केलेल्या व्यूहरचनेमुळे २० जागांवर घवघवीत यश मिळविले. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सत्ता स्थापनेसाठी तीन अपक्षांचा आणि दाेन मगाेपच्या सदस्यांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या यशा नंतर प्रथमच मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींची भेट घेत निवडणुकीतील यशाची माहिती दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी, गाेव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपचे सरचिटणीस सतीश धाेंड हे उपस्थित हाेते.

Prime Minister Narendra Modi Congrulates Goa CM Pramod Sawant.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गाेव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान माेदींनी गाेव्यातील जनतेने पक्षास पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल गाेवेकरांचे आभार मानले.

PM Modi With Goa CM Pramod Sawant

आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू असे वचन ही माेदींनी गाेव्यातील जनतेस दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT