PM kisan samman yojana Saam tv
देश विदेश

PM kisan samman yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा १९ वा हप्ता जमा; तुम्हाला २००० रुपये मिळाले का?

PM kisan samman yojana update : शेतकऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. PM किसान योजनेचा १९ वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला २००० रुपये मिळाले का? जाणून घ्या.

Vishal Gangurde

PM kisan Yojana 19th Installment : देशातील कोट्यवधी शेतकरी मागील काही महिन्यांपासून १९ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी २२ कोटींचा रक्कम ट्रान्सफर केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान देखील होते.

२२ हजार कोटी रुपये ट्रान्सफर

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान निधी योजना चालवली जाते. पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. हीच रक्कम शेतकऱ्यांना खात्यात ट्रान्सफर केली जाते. आज १९ वा हप्ता जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना १९ वा हप्ता मिळणे सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून भागलपूरमधून १९ व्या हप्त्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत एकूण २२ हजार कोटी शेकऱ्यांना ट्रान्सफर केले आहेत. आतापर्यंत ९.७ कोटी शेतकऱ्यांना बँक खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कृषी विद्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार देखील होते. या व्यतिरिक्त शिवराज सिंह चौहान, चिराग पासवान देखील होते. भागलपूरमधील या कार्यक्रमात १३ जिल्ह्यांचे ३ ते ४ लाख शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी कृषी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात ६ वर्षांपू्वी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाली होती. केंद्राच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य केले जाते. १९ वा हप्ता देण्याआधी ११ कोटींहून शेतकऱ्यांना १८ हप्ते दिले आहेत. १८ हप्त्यांमधून शेतकऱ्यांना ३.४६ लाख कोटींहून अधिक रुपयांची रक्कम दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT