PM CARES FUND BALANCE REVEALED; GOVERNMENT RELEASES AUDIT STATEMENT saam tv
देश विदेश

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

PM CARES Fund Balance : 'पीएम केअर्स' (PM CARES) निधीमध्ये जमा झालेली रक्कम सुमारे ८,५०० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या निधीचा लेखापरीक्षण अहवाल अलीकडेच जाहीर करण्यात आला.

Bharat Jadhav

  • PM CARES Fund चा लेखापरीक्षण अहवाल सरकारकडून सार्वजनिक

  • निधीत जमा झालेली रक्कम सुमारे ₹8,500 कोटींवर

  • सरकारने PM CARES Fund संदर्भातील आर्थिक आकडेवारी सार्वजनिक केली

पीएम केअर फंडबाबत विरोधकांसह सामान्य नागरिकांकडून नेहमी प्रश्न उपस्थित केला जात असतो. पीएम केअरमध्ये किती फंड येतो. त्यातील पैसा कुठे खर्च होतो. पीएम केअरमध्ये आतापर्यंत किती शिल्लक उरलीय अशी प्रश्न विरोधकांकडून केली जातात. आता सरकारनं पीएम केअरची माहिती सरकारनं जाहीर केलीय. पीएम केअर फंडमध्ये किती पैसा आहे, याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या निधीबाबत वाद निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार झाले असले, तरी स्थापनेपासून अनेक आणीबाणीच्या प्रसंगी या निधीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'पीएम केअर्स' (PM CARES) निधीने ८,४५२ कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. जाहीर करण्यात आलेल्या २०२४-२०२५ आणि २०२३-२०२४ या वर्षांतील 'पीएम केअर्स' (PM CARES) निधीच्या लेखापरीक्षण अहवालांवरून ही माहिती समोर आलीय.

पीएम केअर्स फंडाच्या निधीत झालेल्या वाढीमुळे मोठं आर्थिक साहाय्य निर्माण झालंय. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आता एक मोठा आर्थिक साठा सुरक्षित झालाय. संकटकाळात तातडीने निधीची गरज भासल्यास सरकारला त्वरित मदत पुरवणे शक्य व्हावे, या विशिष्ट उद्देशानेच पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती.

पीएम केअर्स फंडाचा मोठा हिस्सा मुदत ठेवींमध्ये (फिक्स डिपॉजिट)

'पीएम केअर्स' निधीमध्ये केलेला सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे या निधीतील ८,४५२ कोटी रुपयांच्या एकूण रकमेपैकी मोठा हिस्स ६,६४१ कोटी रुपये आता मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposits) ठेवण्यात आलाय.

याआधी यातील बहुतांश निधी बचत खात्यांमध्ये ठेवला जात असायचा. निधीचा मोठा हिस्सा मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposits) ठेवल्याने अधिक व्याज मिळते; यामुळे या निधीत जलद वाढ होते. एकूण रकमेत सातत्याने विस्तार होतोय. मुदत ठेवींमध्ये मोठी रक्कम ठेवल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ४७४ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळालंय.

एका वर्षात फंडमध्ये १२७९ कोटी रुपयांची वाढ

२०२३-२४ या वर्षात 'पीएम केअर्स' (PM CARES) निधीचा साठा ७,१७३ कोटी रुपये होता. आता तो २०२४-२५ मध्ये वाढून ८,४५२ कोटी रुपये झालाय. म्हणजेच यात जवळपास १,२७९ कोटी रुपयांची वाढ झालीय. एका वर्षात देशांतर्गत देणग्यांतून सुमारे ४७५ कोटी रुपये प्राप्त झालेत. 'पीएम केअर्स' (PM CARES) निधीमध्ये देणग्या येण्याचा ओघ वाढतोय. केवळ गेल्या आर्थिक वर्षात, या निधीमध्ये देशांतर्गत देणग्यांतून सुमारे ४७५ कोटी रुपयांचे योगदान मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT