BJP Minister Piyush Goyal’s statement triggers controversy over Praful Patel’s alleged appointment as NCP National President. Saam Tv
देश विदेश

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Political Uncertainty In NCP After Ajit Pawar Death: अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 दिवसात प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानी केला.. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पटेलांनी काय प्रतिक्रीया दिली आहे.

Bharat Mohalkar

होय... अजितदादांच्या मृत्यूनंतर ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरण्याची चिन्हं निर्माण झालेत...प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा गौप्यस्फोट भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलंय.....

होय ते पियुष गोयल यांचं वक्तव्य आहे.... ज्यामध्ये प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं म्हटलंय... आणि याच वक्तव्यावरुन वादाची ठिणगी पडलीय.राज ठाकरेंनी ट्वीट करत राष्ट्रवादी या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही... असा टोला आधीच लगावला होता....तर गोयलांच्या वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांच्या भुमिकेबाबत राजकीय जाणकारांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली...

पटेलांच्या नियुक्तीबाबत अनेक सवाल

पटेल, पवारांचा पक्ष खालसा करणार का?

प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती केली कुणी?

पियूष गोयलांना नियुक्तीची माहिती मिळाली कुठून?

दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही?

शरद पवारांना पक्षबाहेर ठेवण्याची खेळी आहे का?

मात्र हा वाद टोकाला जाण्याची शक्यता असल्यानं आधी प्रफुल्ल पटेलांनी पियुष गोयलांचा दावा खोडून काढत सारवासारव केलीय.. गोयलांचा गौप्यस्फोट, पटेलांची सारवासारव (HEADER)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या निराधार

या बातम्यात कोणतेही तथ्य नाही

राष्ट्रवादी पक्ष लोकशाही मूल्ये जपणारा पक्ष

मोठ्या पदांच्या निवडीबाबत सर्व प्रक्रियेच पालन केलं जातं

एवढंच नाही तर खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही पटेलांची नियुक्ती केली नसल्याचं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे दादांच्या पक्षाचे नेते माणिकराव कोकाटेंनी सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं ठामपणे सांगितलंय..

तर आपलं वक्तव्य चांगलंच अंगलट आल्यानं पियुष गोयल यांनी ट्वीट करत यु-टर्न घेतलाय.. आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलल्याचं गोयल यांनी म्हटलंय...... हे असं असलं तरी दादांच्या मृत्यूनंतर भाजपच्या हाती राष्ट्रवादीची सुत्रं जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.. त्यातच आता पियुष गोयल यांनी केलेली घोषणा ही निर्णयाआधीची लिटमस टेस्ट होती का? असा प्रश्न उपस्थित होतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापुरात शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित

Rajyasabha Election: तावडे, आवठवलेंसह भाजपच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

Arjun Tendulkar Wedding : शुभमंगल सावधान! सचिनच्या लेकाचं झालं लग्न, अर्जुन-सानियानं घेतले सातफेरे, पाहा व्हिडिओ

Sakhee Gokhale: मोकळे केस अन् घायाळ करणारं सौंदर्य

SCROLL FOR NEXT