Sex is Not a Marital duty Said European court Meta Ai
देश विदेश

Court News : 'सेक्स वैवाहिक कर्तव्य नाही'! पतीसह शारीरिक संबंध न ठेवण्यावर न्यायालयाचा निकाल

Husband and Wife Relationship : पतीशी शारीरिक संबंध ठेवणे हे वैवाहिक कर्तव्य नाही असे युरोपातील मानवाधिकार न्यायालयाने म्हटले आहे. एका घटस्फोटाच्या प्रकरणावर निकाल देताना कोर्टाने असे विधान केले आहे.

Yash Shirke

Court News : आजकाल अनेक घटस्फोटांची प्रकरणे समोर येत आहेत. अशाच एका घटस्फोटाच्या केसची चर्चा होत आहे. एका फ्रेंच महिलेने तिच्या पतीकडे घटस्फोट मागितला होता. तेव्हा न्यायालयाने तिलाच दोषी मानले होते. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवल्याने घटस्फोट झाला असे फ्रेंच न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयावर आपेक्ष घेत महिला सर्वोच्च मानवाधिकार न्यायालय पोहोचली होती.

'घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने शारीरिक संबंधांसारख्या संवेदनशील विषयामध्ये हस्तक्षेप करणे योग्य नव्हते', असे फ्रेंच महिलेचे ठाम मत होते. या प्रकरणावरुन तिने युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालय गाठले. मानवाधिकार न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा न्यायाधीशांनी 'शारीरिक संबंध ठेवणे हे वैवाहिक कर्तव्य नाही' असे म्हणत फ्रेंच महिलेच्या बाजूने निकाल दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंच महिलेचे नाव एच. डब्ल्यू आहे. तिचा जन्म १९५५ मध्ये फ्रान्समध्ये झाला होता. १९८४ मध्ये तिचा विवाह झाला. चार मुलं झाल्यानंतर तिने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. तेव्हा न्यायालयाने 'पतीशी शारीरिक संबंध ठेवत नाही' या कारणावरुन तिला दोषी ठरवले होते. यामुळे महिलेला त्रास सहन करावा लागला होता.

२००४ पासून पतीशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याची माहिती महिलेने दिली होती. शारीरिक समस्या आणि पतीकडे होणारी हिंसा यामुळे संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही असेही तिने न्यायालयाला सांगितले होते. युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने महिलेचे बाजू समजून घेतली आणि निकाल दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT