Philippines Landslide Saam Tv
देश विदेश

भूस्खलनाने कुटुंब हिरावले पण, 'तो' फ्रीजमध्ये लपला, 20 तासांनंतर काढले बाहेर अन्...

फिलीपिन्समध्ये झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या घटनेतून एका 11 वर्षीय मुलाचा जीव वाचला.

वृत्तसंस्था

Philippines Landslide: 2008 साली 'इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात हॅरिसन फोर्डने इंडियानाची भूमिका साकारली होती. यामध्ये काचेच्या रेफ्रिजरेटरमध्ये लपून तो आण्विक स्फोटातून वाचतो. पण तेव्हा कोणालाही कल्पना आली नसेल की असे काही सत्यताही घडू शकते.

अलीकडेच अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये फिलीपिन्समध्ये एक 11 वर्षांचा मुलगा दिवसभर रेफ्रिजरेटरमध्ये बंद राहिल्यनानंतरही भूस्खलनातुन वाचला आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सीजे जस्मे नावाचा मुलगा आपल्या कुटुंबासह घरी होता. यादरम्यान, शुक्रवारी फिलीपिन्समधील बेबे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीच्या भूस्खलनाने त्याच्या घराला पूर आला होता.

मिळालेल्या माहितीनुर, भूस्खलनामुळे सर्व चिखल त्याच्या घराकडे येऊ लागल्याने 11 वर्षांचा मुलगा फ्रीजमध्ये लपून बसला. तो तब्बल 20 तास फ्रीजमध्येच राहिला. जेव्हा वादळ थांबले तेव्हा बचाव पथकाला नदीच्या काठावर एक रेफ्रिजरेटर आढळून आला. त्यानंतर रेस्क्यू टीमने जस्मेला त्या फ्रीजमधून बाहेर काढले.

फ्रीज उघडताच तो म्हणाला - 'मला भूक लागली'

त्यानंतर, जेव्हा त्या मुलाला बरे वाटले तेव्हा तो म्हणाला, 'मला भूक लागली आहे.' मीडिया रिपोर्ट्सनुसार जस्मे शुद्धीत होता पण त्याचा पाय तुटला होता. नंतर त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या तुटलेल्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले.

मुलाचे कुटुंबीय बेपत्ता!

मुलाच्या प्रकृतीची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, जस्मेचे कुटुंब म्हणजेच त्याची आई आणि लहान भाऊ अद्याप बेपत्ता आहेत, तर त्याच्या वडिलांचा आदल्या भूस्खलनात मृत्यू झाला.

वादळामुळे मोठे संकट;

या वादळामुळे बेबे शहरात सुमारे 200 लोक जखमी झाले असून सुमारे 172 लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की वादळामुळे 200 दशलक्षाहून अधिक लोकांना भुख्खलनाने प्रभावित क्षेत्र सोडून जावे लागले आहे. तर, बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी बचाव पथक अजूनही मातीचे ढिगारे, माती आणि ढिगाऱ्यांमध्ये शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

SCROLL FOR NEXT