Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात चढ-उतार होत असतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली. (Petrol Diesel Price Today)

जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल सुमारे 9 डॉलरने कमी झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत.

हे देखील पाहा -

सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला तरीही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. क्रूडच्या किंमत एका वेळी प्रति बॅरल 140 डॉलर वर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 113.8 डॉलर होती, जी आज सकाळी प्रति बॅरल 105.4 डॉलरवर आली. WTI ची किंमत प्रति बॅरल सुमारे 101डॉलरआहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 प्रति लिटर

या शहरांमध्येही नवीन दर जारी करण्यात आले आहेत

- नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे.

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

- पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT