Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमतीत चढउतार होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली. कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या खाली आले आहेत. दरम्यान, क्रूड तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केलेत. (Petrol Diesel Prices Today)

आज सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल 98 डॉलर इतके झाले आहे. क्रूड स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची आशा वाढली असली, तरी सध्या तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 6 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. आजही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. (Petrol Diesel Prices In Maharashtra)

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

Summer Season Tips: उन्हाळ्यात पाळीव प्राण्याची कशी घ्याल काळजी ?

Fraud Case : साखरेचे भाव वाढणार असल्याचे सांगत व्यापाऱ्यालाच गंडविले; ४० लाखात केली फसवणूक

Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

SCROLL FOR NEXT