Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. गेल्या २४ तासात ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरेल १ डॉलरने वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोल (Petrol) अजूनही १०६ रुपयांच्या वरच आहे. (Petrol Diesel Prices)

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ६ एप्रिल रोजी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

गेल्या २४ तासात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत एक डॉलरने वाढली आहे, प्रति बॅरेल ९७ डॉलरवर पोहोचली आहे.

असे आहेत आजचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दरात झाले बदल

नोएडामध्ये पेट्रोल ९६.७९ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पाटणामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT