Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

सीएनजी झाला महाग, पाहा आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?

भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल- डिझेलचे नवे भाव (Petrol-Diesel Price) जारी केले

साम टीव्ही ब्युरो

मुंबई: भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल- डिझेलचे नवे भाव (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ११२ डॉलर प्रति बॅरेलवर येऊन पोहोचले आहे. तरीदेखील मागील अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल (Petrol Price)- डिझेलचे भाव (Diesel Price) स्थिर आहेत. आज देखील देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला नाही.

तेल कंपन्यांनी एक दिवस अगोदर सीएनजीच्या (CNG) भावात वाढ केली आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलचे भाव गेल्या ४१ दिवस झाले स्थिर आहे. याअगोदर मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये १०.२० रुपये प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. यापूर्वी ६ एप्रिल दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Diesel Price) भावामध्ये वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel Price) भावात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली. दरम्यान, ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ११० डॉलरच्या वर राहिल्यास तेल कंपन्या परत एकदा भाव वाढवू शकतात.

हे देखील पाहा-

दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला नाही. सोमवारी दिल्लीमध्ये १ लिटर पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये आणि १ लिटर डिझेलची किंमत ९६.६७ रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलसाठी १०४.७७ रुपये द्यावे लागत आहेत.

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या भावानुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोल १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानी शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळेस भाववाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भावामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे.

देशातील या शहरातील भाव काय?

शहर पेट्रोलचे भाव (प्रति लिटर) डिझेलचे भाव (प्रति लिटर)

मुंबई १२०.५१ १०४.७७

दिल्ली १०५.४१ ९६.६७

चेन्नई ११०.८५ १००.९४

कोलकाता ११५.१२ ९९.८३

हैद्राबाद ११९.४९ १०५.४९

कोलकाता ११५.१२ ९६.८३

बंगळुरू १११.०९ ९४.७९

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच ९२२४९९२२४९ वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव तपासू शकणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT