Petrol Diesel Prices Today Saam TV
देश विदेश

कच्चे तेल पुन्हा महागले, पेट्रोल, डिझेल महागणार? पाहा नवे दर

जागतिक बाजारात पुन्हा कच्च्या तेलांच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: c दोन दिवसापूर्वी कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खाली येणार असं बोलले जात होते. (Petrol Diesel Prices)

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल (Petol) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार महानगरांमध्ये ६ एप्रिलपासून तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. मात्र, केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर मे महिन्यात पेट्रोल ९ रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले.

आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

-नोएडामध्ये पेट्रोल ९६.९२ रुपये आणि डिझेल ९०.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे.

-लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पाटण्यात पेट्रोल १०७.५९ रुपये आणि डिझेल ९४.३६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.(Petrol Diesel Prices)

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर पाहू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकता. तर BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकता. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमती पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT