Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्चे तेल झाले स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. आज शुक्रवारीही दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोल (Petrol) ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रतिलिटर दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. चढत-उतार सुरुच आहे. आज क्रूड ऑईल प्रति बॅरेल १०० डॉलरच्या खाली आहे. (Petrol Diesel Prices)

सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल १०० डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे आता देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. देशातील चार महानगरांमध्ये ६ एप्रिलपासून तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. मात्र, केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर मे महिन्यात पेट्रोल ९ रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

या शहरातील नवे दर

नोएडामध्ये पेट्रोल ९६.९२ रुपये आणि डिझेल ९०.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पाटण्यात पेट्रोल १०७.५९ रुपये आणि डिझेल ९४.३६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल (Petrol) डिझेलचे रोजचे दर पाहू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकता. तर BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकता. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमती पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT