Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel : आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आली आहे. त्याचा परिणाम आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींवरही दिसून आला. आज, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती यूपीपासून बिहारपर्यंत कमी झाल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Latest Price)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 5 पैशांनी स्वस्त होऊन 96.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 5 पैशांनी घसरून 89.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. गाझियाबादमध्येही पेट्रोल 32 पैशांनी घसरून 96.26 रुपये प्रति लीटरवर आले आहे, तर डिझेल 30 पैशांनी स्वस्त होऊन 89.45 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोलचा दर 53 पैशांनी घसरून 107.59 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेल 50 पैशांनी घसरून 94.36 रुपये प्रति लिटरवर आला आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT