Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ; महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल महागणार?

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलर पर्यंत वाढली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल झाला आहे. आज नोएडासह बहुतांश शहरांमध्ये तेलाच्या किंमतीत घसरत आहेत. (Latest Marathi News)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर येथे पेट्रोल (Petrol) 35 पैशांनी घसरून 96.65 रुपये, तर डिझेल 22 पैशांनी घसरून 89.71 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. लखनऊमध्ये आज पेट्रोल15 पैशांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 96.47 रुपये आहे. याशिवाय हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 41 पैशांनी स्वस्त होऊन 96.77 रुपये प्रति लिटर झाले आहे. येथे डिझेल (Diesel) 14 पैशांनी महागले असून ते 90.05 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT