Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel: गुजरातसह 'या' राज्यांमध्ये पेट्रोल- डिझेल महागले; महाराष्ट्रातही इंधन महागणार?

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पेट्रोल (Petrol) निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने उत्पादनात कपात केल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 94.42 डॉलर पर्यंत वाढली आहे, तर WTI प्रति बॅरल 88.53 डॉलरवर पोहोचले आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel Latest Update)

काही राज्यांमध्ये किमतीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये चढ-उतार दिसून आले आहेत. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.40 रुपयांनी वाढून 103.58 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.55 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 0.21 रुपयांनी वाढून 96.42 रुपये आणि डिझेल 94.28 रुपये लिटर झाले आहे. झारखंडमध्येही पेट्रोल 0.26 रुपयांनी वाढून 100 च्या वर म्हणजेच 100.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. याशिवाय इतर काही राज्यांमध्येही तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT