Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेत.

वृत्तसंस्था

Petrol Diesel : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. शनिवारी ब्रेंट क्रूड 2.94 डॉलरने घसरून 91.63 डॉलर प्रति बॅरल झाले आहे. दुसरीकडे, WTI देखील 3.50 डॉलरने घसरून 85.61 प्रति बॅरल स्वस्त झाले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी भारतात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel Latest Price)

हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल 0.87 रुपयांनी वाढून 95.93 रुपये आणि डिझेल 0.74 रुपयांनी वाढून 82.15 रुपये प्रति लिटर झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 0.44 रुपयांनी 100.79 रुपये आणि डिझेल 0.41 रुपयांनी 86.05 रुपयांनी महागले आहे. बिहारमध्ये (Bihar) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे येथे पेट्रोल 0.49 रुपयांनी स्वस्त होऊन 109.17 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 0.46 रुपयांनी 95.82 रुपयांनी स्वस्त होत आहे. (Tajya News)

याशिवाय हरियाणामध्ये पेट्रोल 0.21 रुपयांनी 97.34 रुपयांनी आणि डिझेल 90.19 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 0.54 रुपयांनी 96.35 रुपये आणि डिझेल 0.53 रुपयांनी 86.71 रुपयांनी विकले जात आहे. देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT