Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल

जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारी, ब्रेंट क्रूड 3.90 डॉलरने वाढून प्रति बॅरल 98.57 डॉलर इतके झाले आहे. WTI 4.44 डॉलरने वाढून प्रति बॅरल 85.05 डॉलर इतके झाले आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price In Marathi)

छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.50 रुपयांनी महागले असून ते 10.3.58 रुपयांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, डिझेल 0.49 रुपयांच्या वाढीसह 96.55 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डिझेल 0.59 रुपयांनी वाढून 95.65 रुपये आणि डिझेल 0.50 रुपयांनी वाढून 81.91 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोल 0.49 ते 96.40 पैशांनी प्रतिलिटर तर डिझेल 0.48 रुपयांनी घसरत 86.76 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही भावात किंचित घट झाली आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT