Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : महाराष्ट्रसह राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी झेप? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा चढ-उतार झालेला नाही, मात्र सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात बदल झाला आहे. शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Latest Price In Marathi)

राजस्थानमध्ये पेट्रोल 0.96 रुपयांनी वाढून 109.03 रुपये आणि डिझेल 0.87 रुपयांनी वाढून 94.22 रुपये झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 1.01 रुपयांनी 106.97 रुपये आणि डिझेल 0.97 रुपयांनी 93.46 रुपयांनी महागले आहे.

याशिवाय छत्तीसगडमध्येही पेट्रोल 0.44 रुपयांनी वाढून 103.42 रुपये आणि डिझेल 0.43 रुपयांनी वाढून 96.39 रुपये झाले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि झारखंडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये इंधनाचे दर थोडे कमी झाले आहेत. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT