Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : 'या' राज्यात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत मोठा बदल

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतीही दिसून येत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. आजही देशातील चारही महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोलचा दर 0.7 पैशांनी वाढून 96.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.7 पैशांनी वाढून 89.93 रुपये प्रति लिटर झाला आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 35 पैशांनी महाग होऊन 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 33 पैशांनी महागून 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोलचे दर 21 पैशांनी वाढून 96.57 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 20 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटर झाला आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT