Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel: कच्च्या तेलात दरात आणखी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? नवे दर जाहीर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा सुमारे दीड टक्‍क्‍यांची कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. असे असतानाही चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (Petrol) दर समान पातळीवर आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील इंधनाच्या किंमती चार महिन्यांपूर्वी बदलण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्राने तेलाच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता.

गेल्या तीन महिन्यांत कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ३० डॉलरने कमी झाले आहे. मंगळवारी WTI क्रूड प्रति बॅरल 84.45 डॉलर आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 90.35 डॉलर पर्यंत घसरले. यावर्षी 22 मे 2022 रोजी मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच महाराष्ट्रात शिंदे सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Petrol Diesel Latest News)

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

Shivali Parab : शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत...

Devendra Fadnavis : पाकिस्तानने रचलेलं मोठं षडयंत्र त्यांनी कोर्टासमोर आणलं; उज्वल निकम यांचं नाव घेत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Vishal Patil: अल्टिमेटम संपला तरी विशाल पाटील ठाम! काँग्रेस करणार कारवाई?

SCROLL FOR NEXT