Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार?; सलग तिसऱ्या दिवशी कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण

शनिवारी सकाळी कच्चा तेलाच्या दरात मोठी घट झाली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किमतीत घसरण होत आहे. आजही कच्चा तेलाच्या किमतीत अचानक घसरण झाली आहे. शनिवारी सकाळी कच्चा तेलाच्या दरात मोठी घट झाली. कच्चा तेलाचे दर 5 डॉलर्सनी घसरून प्रति बॅरल 113 डॉलरवर आले. कच्चा तेलाच्या किमतीत घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे (Petrol-Diesel) नवे दर जारी केले. (Petrol Diesel Latest Price In Maharastra)

मागील महिनाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या होत्या. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून यामध्ये सातत्याने घसरण होत आहे. कच्चा तेलाची किमत एका दिवसात 5 डॉलरने घसरली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती अशाच घसरत राहिल्यास देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केले. त्यानुसार आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. वास्तविक, अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT