Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; 'या' राज्यात इंधन स्वस्त

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Latest Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती जाहीर केल्या जातात.

दरम्यान, शनिवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

आज देशातील विविध राज्यांमध्येही  पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात फारसा चढ-उतार झालेला नाही. तेलंगणा आणि मिझोराम ही दोन राज्ये आहेत जिथे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलंगणामध्ये पेट्रोल 1.56 रुपयांनी आणि डिझेल (Diesel)  1.46 रुपयांनी महागले आहे, तर पंजाबमध्ये पेट्रोल 29 पैशांनी 97.61 रुपये आणि डिझेल 28 पैशांनी 87.95 रुपये स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त झालं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT