Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त; तुमच्या शहरातील नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज जाहीर केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही किंमत निश्चित केली जाते. (Latest Marathi News)

आज महाराष्ट्रात पेट्रोल 0.30 पैशांनी घसरून 106.21 रुपये आणि डिझेल (Diesel) 29 पैशांनी घसरून 92.73 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुजरातमध्ये पेट्रोलचा दर 0.63 पैशांनी घसरून 96.49 रुपये झाले आहे. येथे डिझेल 64 पैशांच्या घसरणीसह 92.23 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट दिसून येत आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये पेट्रोल 0.18 पैशांनी तर डिझेल 0.17 पैशांनी महागले आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. (Petrol Price)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT