pegasus Spyware प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी Saam Tv
देश विदेश

pegasus Spyware प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑगस्ट रोजी याचिकांवर केंद्राला नोटीस बजावली होती.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या pegasus Spyware माध्यमातून काही व्यक्तींच्या कथित हेरगिरीची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. 7 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश एन.व्ही.रामाना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता Tushar Mehta यांनी काही अडचणींमुळे ते दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे सांगितल्यानंतर केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी अधिक वेळ दिला होता. यापूर्वी, केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते की, पेगासस हेरगिरी प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका मीडिया रिपोर्ट किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑगस्ट रोजी याचिकांवर केंद्राला नोटीस बजावली होती.

दरम्यान, इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला होता. इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपने हे स्पायवेअर बनवले आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आले त्यांची एक यादी काही दिवसांपूर्वी लीक झाल्याची झाली होती. या यादीमध्ये ३०० हून अधिक भारतीय मोबाइल नंबर असल्याची बाब उघडकीस आली होती. पेगासस स्पायवेअर वापरलेल्या गेलेल्या डेटाबेसमध्ये भारतीय मंत्री, विरोधी नेते आणि पत्रकार यांचे फोन नंबर सापडले होते.

काय आहे पेगासस स्पायवेअर ?

२०१६ मध्ये ही कंपनी चर्चेत आली कारण त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्याला हे वाटत होते की पेगासस द्वारे आयफोन युजर्सचे फोन हॅक केले जात आहे. मात्र कंपनीने iOSचं अपडेटेड व्हर्जन पेगाससद्वारे हॅक केले जाऊ शकणाऱ्या कमतरता दूर केल्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र वर्षभरानंतर हे स्पायवेअर अँड्रॉइड फोन सहज हॅक करू शकते अशी माहिती समोर आली. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. फेसबुकने देखील एनएसओ ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

हे स्पायवेअर कसं काम करतं?

ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन केल्यास पेगासस फोनमध्ये इन्स्टॉल होते. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील पेगासस इन्स्टॉल केले जाऊ शकते.युजरला मिसकॉल देऊन सुद्धा फोन हॅक केला जाऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT