Paytm Layoff  Saam tv
देश विदेश

Paytm कडून पुन्हा कर्मचारी कपात! १००० हून अधिक लोकांना दाखवला थेट घरचा रस्ता

Paytm lays off over 1000 employees : इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार विविध युनिट्समध्ये कर्मचारी कपात करण्यात आले आहे. देशातील सगळ्यात मोठी डिजीटल कंपनी असलेल्या पेटीएममधून १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे.

कोमल दामुद्रे

Paytm Layoff :

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार विविध युनिट्समध्ये कर्मचारी कपात करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात करण्याचे सुरु आहे असे अहवालात म्हटले आहे. देशातील सगळ्यात मोठी डिजीटल कंपनी (Company) असलेल्या पेटीएममधून १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे.

पेटीएमने (Paytm) आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी ही टाळेबंदी केली आहे. पेटीएमच्या या टाळेबंदीमुळे त्याच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या (Job) सोडव्या लागल्या आहेत.

भारतीय स्टार्टअपमधील ही सगळ्यात मोठी टाळेबंदी आतापर्यंतची मानली जात आहे. यंदाचे वर्ष हे अनेक स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगले राहिले नाही. या वर्षी भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या तीन महिन्यात २८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.

1. RBI च्या कारवाईचा परिणाम

रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जावर नियामक निर्बंध लादले होते, यामुळे पेटीएमवरही परिणाम झाला होता. आरबीआयच्या कारवाईनंतर छोटे तिकीट ग्राहक कर्ज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खरेदी करा आणि नंतर व्यवसाय करा. तसेच पेटीएमचे शेअर्स गेल्या महिन्याभरात जवळपास २८ टक्क्यांनी घसरला आहे. तर मागच्या सहा महिन्यात त्याची किंमत २३ टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कपात केल्यामुळे पेटीएमच्या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT