Patna-Jharkhand Train Caught Fire Saam Digital
देश विदेश

Patna-Jharkhand Train Fire: पटना-झारखंड पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; पाहा थरकाप उडवणारा Video

Patna-Jharkhand Passenger Train Fire: पटना झारखंड पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली असून अनेक डबे जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Sandeep Gawade

पटना झारखंड पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली असून अनेक डबे जळून खाक झाले आहे. घटनास्थळी एकच धावपळ उडाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कोणतीही जीवितनाही झाल्याच अद्यापतरी वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय येथे पटना-झारखंड पॅसेंजर ट्रेनच्या अनेक डब्यांना अचानक आग लागली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. आग नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचारी आणि पोलिसांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत भागीने रौद्ररूप धारण केलं होतं. यात काही डबे पूर्ण जळून खाक झाले आहेत. शेवटंच वृत्त हाती आलं तोपर्यंत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

सोमवारीचं दिल्लीतील सरिता विहार पोलीस स्थानकानजीत ताज एक्स्प्रेसच्या एका डब्याला भीषण आग लागली होती. एकूण 6 अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. संध्याकाळी 4.41 वाजता ट्रेनला आग लागल्याचा पीसीआरला फोन आला होता. घटनास्थळी ताज एक्स्प्रेस ट्रेनच्या तीन डब्यांना आग लागल्याचे लक्षात आलं. ट्रेन थांबवण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून ट्रेनमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.

भायखळा स्थानकांवर धूरच धूर; धावत्या लोकलमधून घेतल्या उड्या

भायखळा रेल्वे स्थानकांवर अचानक धूरच धूर दिसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. धावत्या ठाणे लोकलमधून प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोनतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, रेल्वे स्थानकांवर अचानक इतका धूर कशामुळे आला अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT