Delhi SpiceJet flight Saam Tv
देश विदेश

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला आग; थरारक व्हिडिओ

आगीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर आले. विमान उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले.

साम वृत्तसंथा

पाटणा: काल शनिवारी पटनाहून दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला आग लागल्याने पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात १९१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाइसजेट 737-800 विमानाच्या डाव्या इंजिनला टेकऑफनंतर काही मिनिटांत आग लागल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करताच त्याच्या एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली, त्यानंतर विमान सुरक्षितपणे पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. विमान वाहतूक नियामकाच्या माहितीनुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे इंजिनला आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

"विमानात आग लागल्याची माहिती स्थानिक लोकांनी जिल्हा आणि विमानतळ प्राधिकरणाला दिली होती. सध्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत. कारण विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अभियंत्यांची टीम पुढील विश्लेषण करत आहे, अशी माहिती पाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोर्चावर बाटली फेकून मारणे योग्य नाही- गिरीश महाजन

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

राज्यातील साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटणार; देवस्थान जमिनींबाबतचा सरकारचा मोठा निर्णय

Dhurandhar : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! बॉक्स ऑफिसवर पुन्हा येणार 'धुरंधर' चं तुफान, रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT