पासपोर्टसाठी नवे शुल्क लागू करण्यात आले आहेत.  saam tv
देश विदेश

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Passport fees hiked from july 2026 check new charges : केंद्र सरकारनं पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे. १ जुलै २०२६ पासून नवे शुल्क लागू होणार आहेत. ज्या नागरिकांना जुन्या शुल्कानुसार पासपोर्ट बनवून घ्यायचे आहेत, ते १ जुलैच्या आधीच अर्ज करू शकतात.

Nandkumar Joshi

जर तुम्हाला नवीन पासपोर्ट काढायचा आहे किंवा जुन्या पासपोर्टचं नुतनीकरण करून घ्यायचं आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पासपोर्टसाठी सुधारित शुल्क जाहीर केले आहेत. पासपोर्टसाठीचे नवे शुल्क १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.

सरकारने पासपोर्ट नियम १९८० मध्ये बदल केला आहे. सर्वसाधारण (Normal Paasport) आणि तात्काळ (Tatkaal Paasport) अशा दोन्ही पासपोर्ट सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे. जर जुन्या शुल्कानुसार पासपोर्ट तयार करायचा असल्यास १ जुलै २०२६ पूर्वीच अर्ज दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

१८ वर्षांवरील नागरिकांसाठी नवे शुल्क (new passport fees for normal and tatkal services)

  • ३६ पानी नवे किंवा रि-इश्यू पासपोर्ट - २५०० रुपये (सर्वसाधारण), ५००० रुपये (तात्काळ)

  • ६० पानी नवे / रि-इश्यू पासपोर्ट - ३५०० रुपये (सर्वसाधारण), ६००० रुपये (तात्काळ)

  • हरवल्यास किंवा फाटल्यास ३६ पानी पासपोर्ट - ५००० रुपये (सर्वसाधारण), ७५०० रुपये (तात्काळ)

  • पासपोर्ट हरवल्यास किंवा फाटल्यास ६० पानी पासपोर्टसाठी - ६००० रुपये (सर्वसाधारण), ८५०० रुपये (तात्काळ)

१८ वर्षांखालील मुलांसाठी नवे शुल्क

  • ३६ पानी नवे किंवा रि-इश्यू पासपोर्ट - १७५० रुपये (सर्वसाधारण), ४२५० रुपये (तात्काळ)

  • हरवल्यास किंवा फाटल्यास ३६ पानी पासपोर्ट - ४२५० रुपये (सर्वसाधारण), ६७५० रुपये (तात्काळ)

  • अन्य आवश्यक सेवांसाठी नवे शुल्क

  • पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) - ७५० रुपये

  • सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी - १००० रुपये

  • इमर्जन्सी सर्टिफिकेट (विदेशात) १५ अमेरिकी डॉलर

जुने शुल्क किती होते?

आतापर्यंत ३६ पानी नवं पासपोर्ट तयार करण्यासाठी किंवा नुतनीकरणासाठी १५०० रुपये शुल्क आकारले जात होते. आता हेच नवे शुल्क २५०० रुपये करण्यात आले आहे. ६० पानी पासपोर्टसाठी यापूर्वी २००० रुपये द्यावे लागत होते. आता ३५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर हरवले किंवा फाटले तर ३६ पानी पासपोर्टचे शुल्क ३००० रुपये होते, त्यात वाढ करून ५००० रुपये करण्यात आले आहे. तर ६० पानी पासपोर्टचे शुल्क ३५०० रुपयांवरून ६००० रुपये करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळेल दिलासा

Maharashtra News Live Update: पंढरपूर माळशिरस तालुक्याला पावसाने झोडपले

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT