Parliament Security Breach Accused Lalit Jha Arrest Saam Tv
देश विदेश

Lalit Jha Arrest: संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा'ला अटक, दिल्ली पोलिसांना मोठे यश

Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी या घटनेतील सहाव्या आरोपी आणि कथित सूत्रधाराला अटक केली.

Satish Kengar

Parliament Security Breach Main Accused Lalit Jha Arrest: 

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी या घटनेतील सहाव्या आरोपी आणि कथित सूत्रधाराला अटक केली. आरोपी ललित झा याला दिल्लीतून अटक करण्यात आली.

या घटनेचा कथित मुख्य सूत्रधार मानला जाणारा ललित झा याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी पोलिसांनी दहशतवादविरोधी कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली सुरक्षेतील त्रुटींबाबत गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला की, भारतातील ब्रिटीश राजवटीत क्रांतिकारक भगत सिंह यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याच्या घटनेची त्यांना पुनरावृत्ती करायची होती. (Latest Marathi News)

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी स्मोक बॉम्बचा वापर करून संसदेत पत्रके फेकण्याची योजना आखली होती. त्यांनी तिरंगा झेंडेही खरेदी केल्याचे त्यात म्हटले आहे.

संशयित मुख्य सूत्रधार ललित झा याच्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांच्या विशेष कक्षाने एनजीओचे संस्थापक नीलक राख यांच्याशी संपर्क साधला होता. झा हा कोलकाता येथील एका NGO चा भाग असल्याचे सांगितले जाते. ललित झा याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अनेक पथक प्रयत्न करत होते. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, तो मुख्य कटकारस्थानांपैकी एक आहे

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत चारही आरोपींनी असा दावा केला आहे की त्यांनीच संपूर्ण घटनेची योजना आखली आणि ती राबवली."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT