Parliament Monsoon Session Saam Tv
देश विदेश

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; 'या' मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता

Parliament Monsoon Session 2024 Start From Today: संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतेय. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सोमवार २२ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु, त्यापूर्वी निर्मला सीतारामन लोकसभेत मोदी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल दुपारी १ वाजता तर राज्यसभेत दुपारी २ वाजता सादर करणार आहेत.

आर्थिक सर्वेक्षणात काय?

दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. या अहवालात देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा मांडला जातो. आर्थिक सर्वेक्षणामधे रोजगार, जीडीपी, महागाई आणि गेल्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तूट याबद्दल माहिती दिली जाते. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर सरकारची दुपारी अडीच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार (Parliament Monsoon Session 2024) आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नीट महागाई, बेरोजगारी, उत्तर प्रदेशातील कावड यात्रा या विषयांवरून विरोधक आक्रमक राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजपासून सुरू होणारे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार (Parliament Monsoon Session Update) आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. तर उद्या २३ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

अधिवेशनामध्ये एकूण १९ बैठका

केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी २१ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली (PM Modi) होती. १२ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये एकूण १९ बैठका होणार असल्याची माहिती मिळतेय. यादरम्यान एनडीए सरकारकडून सहा विधेयकं मांडले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आता हे अधिवेशन किती वादळी (Rahul Gandhi) ठरणार? विरोधक सरकारला कोणत्या प्रश्नांवरून कोंडीत पकडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT