Seema Haider Saam Tv
देश विदेश

Seema Haider: सीमा हैदरने तिरंगा फडकवत 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा; व्हिडीओ होतोय व्हायरल

Seema Haider News : पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनी सीमा हैदरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Seema Haider Raises Hindustan Zindabad Pakistan Murdabad slogans : पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. सीमा तिच्या भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून इथे आली आहे. तिच्यावर अनेकांनी ती पाकिस्तानी एजंट असल्याचाही आरोप केला. अशातच पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीमा हैदर आणि भारतातील सचिन मीना यांची पब जी खेळताना ओळख झाली. या ओळखीचं मैत्रित आणि मैत्रिचं प्रेमात रुपांतर झालं. सीमा प्रेमासाठी ४ मुलांसह भारतात आली. तिच्यावर आएसआय एजंट असल्याचे आरोपही होत आहे. अशातच स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर तिने 'पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत .

उद्या देशात स्वतंत्र दिन साजरा केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीमा हैदर आणि तिचा नवरा सचिन मीनाने 'हर घर तिरंगा' या मोहिमेअंतर्गत ध्वजावंदन केले. सीमाने नोएडातील राहत्या घरात ध्वजावंदन केले आहे. सीमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ती तिच्या मुलांसोबत हिंदुस्थान जिंदाबादजच्या घोषणा दिल्या. तिने यावेळी तिरंग्याची साडी नेसली आहे. डोक्यावर 'जय माता दी' असं लिहलेली ओढणी बांधली आहे. तसंच हातात तिरंगा पकडून घोषणा देताना दिसत असते.

पाकिस्तानातून सीमा भारतात आली त्यावेळी काही लोकांनी कौतुक केले, तर काही लोकांनी तिला परत पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. सीमाला एका राजकीय पक्षाकडून ऑफर आल्याचीही चर्चा होत होती. तर आता सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीवर चित्रपटही बनवला जाणार आहे. परंतु याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT