Pakistan Train Accident Saamtvnews
देश विदेश

Pakistan Train Accident: पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात! हजारा एक्सप्रेसचे १० डबे घसरले; १५ जणांचा मृत्यू

Hazara Express Derail In Nawabshah Area: रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

Gangappa Pujari

Pakistan Train Accident: पाकिस्तानमधून एक भीषण रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. हे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे.

याबाबत पाकिस्तानी वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नवाबशाहमधील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हजारा एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला. ही ट्रेन कराचीहून रावळपिंडीला जात होती. सरहरी रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनचे १० डबे रुळावरुन खाली घसरले.

यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर लाहोरमध्ये माध्यमांशी बोलताना रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक म्हणाले की, "अधिकाऱ्यांना या घटनेबाबत सतर्क करण्यात आले आहे. अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT