Bomb Blast: Saam Tv
देश विदेश

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमधील पख्तूनख्वामध्ये मोठा बॉम्बस्फोट; ७ जणांचा मृत्यू

Bomb Blast: पाकिस्तानमध्ये एका कार्यालयात मोठा बॉम्बस्फोट झालाय यात ७ जणांचा मृ्त्यू झालाय तर यात अनेकजण जखमी झालेत.

Bharat Jadhav

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात मोठा बॉम्बस्फोट झालाय. यात ७ जणांचा मृत्यू झालाय तर ९ जण जखमी झालेत. या स्फोटाप्रकरणी पोलीस अधिकारी उस्मान वजीर यांनी माहिती दिलीय. हा स्फोट खैबसर पख्तूनख्वा भागातील दक्षिण वजिरिस्तान जिल्ह्यातील प्रमुख शहर वाना येथे झाला. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार,या स्फोटात १६ जण जखमी झाले होते, त्यापैकी ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विस्फोटात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींची अवस्था गंभीर आहे. दरम्यान अद्याप कोणत्याच दहशतवादी ग्रुपने या विस्फोटाची जबाबदारी घेतली नाहीये. शांती समिती तालिबानचा विरोध करते. ही समिती स्थानिक लोकांचे वाद सोडवण्याचं काम करते,अशी माहिती पोलीस अधिकारीने दिलीय. दरम्यान अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५४ दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सैन्याने कठंस्नान घातलं होतं.

ही चकमक वजिरिस्तान जिल्ह्यात झाली होती. त्यानंतर शांती समितीमध्ये बॉम्ब विस्फोट झाला. हा विस्फोट इतका भीषण होता की, शांती समितीचं कार्यालयाची इमारत नष्ट झालीय. यात अनेक लोक त्या इमारतीच्या मलब्या खाली दबल्या गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT