Pakistan Army convoy terror attack in Lasbela Balochistan saam tv
देश विदेश

पाकिस्तान हादरलं! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २३ पेक्षा जास्त जवान ठार

Army Convoy Attacked in Lasbela : बलुचिस्तानमधील लासबेला जिल्ह्यात पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, कराची आणि क्वेटा यांना जोडणाऱ्या एन-२५ (N-25) महामार्गावर हा हल्ला झाला.

Bharat Jadhav

  • बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यात पाकिस्तान लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केल्याची माहिती.

  • कराची-क्वेटाला जोडणाऱ्या N-२५ राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.

  • २३ हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तानात मोठा दहशवादी हल्ला झालाय. लासबेला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करत हा हल्ला झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान लष्कराचा ताफा जात असताना N-25 या राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात २३ हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.

या घटनेत इतर अनेक सैनिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना लासबेलाच्या कशारी भागात घडली, या भागातील महामार्गावरून 'फ्रंटियर फोर्स'च्या सुमारे १५ वाहनांचा ताफा जात होता. या ताफ्याला एका स्फोटाद्वारे लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतर सुरक्षा दलाच्या एका वाहनाला आग लागली. जखमी सैनिकांना सर्वप्रथम बेला कॅम्पमध्ये नेण्यात आले.

या हल्ल्यासाठी 'बलुच लिबरेशन आर्मी'ला (BLA) जबाबदार धरले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही संघटना बलुचिस्तानमधील सुरक्षा दले, सरकारी इमारती आणि रस्त्यांवरील हल्ले तीव्र करत आहे. BLA चा दावा आहे की, त्यांचे लढाऊ सदस्य पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

हॉकी संघाने इतिहास घडवला! टीम इंडियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचव्यांदा जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT