दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानच्या लाहोर प्रशासनानं भारतीयांच्या भुवया उंचावणारा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे जगभरातही आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण कायम भारतविरोधी भूमिका घेण्याऱ्या पाकनं आपल्या काही प्रमुख ठिकाणांची नावं बदलून चक्क हिंदू देव-देवतांची नावं दिली आहेत.
फाळणीपूर्वी पंजाबची संस्कृती आणि इतिहासाचं केंद्र असलेलं लाहोर शहरातील चौकांना इस्लामिक नाव बदलून हिंदू आणि सांस्कृतिक नावे दिल्यानंतर आता राम कृष्णाचा डंका पाकिस्तानात वाजणारेय. पाकमधील कोणत्या चौकांची नावं बदलण्यात आली पाहूयात.
इस्लामपुरा परिसराचे नवे नाव आता कृष्णनगर
बाबरी मस्जिद चौक आता मूळ जैन मंदिर चौक
सुन्नतनगर भागाला जुने नाव संतनगर
मुस्तफाबाद परिसराचे नाव बदलून धरमपुरा
रहमान गल्लीला पुन्हा लाभले राम गल्ली नाव
मौलाना जफर अली खान चौक बनला लक्ष्मी चौक
अमृतरसरपासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेल्या लाहोरमध्ये आजही पंजाबच्या संस्कृतीचं पालन केलं जातं. फाळणी वेळी तिथून लाखो हिंदू आणि शीख बांधव स्थंलातर करुन भारतात आल्यानंतर पाकच्या कट्टरपंथीयांनी हळूहळू या शहराचा इतिहासच बदलून टाकला. मात्र, आता तब्बल ८० वर्षांनंतर पाकिस्तानला आपला खरा इतिहास समोर आणण्याची बुद्धी सुचलीये. पण ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे की पाकिस्तानच्या मानसिकतेत झालेला बदल आहे असाही प्रश्नये. यावर भारतीयांच्या काय प्रतिक्रिया आहे ते पाहूयात.
एकीकडे देशात अलाहाबादचं प्रयागराज आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर होत असतांना पाकनं देखिल इतिहासाचं स्मरण केल्याचं दिसतंय. पाकच्या या निर्णयामुळे आपल्याला हुरळून जाण्याची अजिबात गरज नाही. जो पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादाची फॅक्टरी चालवतो, तिथं अचानक हिंदू नावांचं प्रेम ऊतू जाण्यामागे नक्कीच काहीतरी मखलाशी असू शकते अशी शंकाये.. आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळलेली आणि कट्टरतावादी प्रतिमा सुधारण्यासाठी आर्थिक संकटात सापडलेल्या पाकला कदाचित हा सेक्युलर मुखवटा चढवावा लागला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू बाबरी चौक पुसून पुन्हा जैन मंदिर नाव होणं, हा काळाचा महिमाच म्हणावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.