आखातातील युद्धामुळे कंगाल पाकिस्तान पुरता भिकेला लागलाये. पाकला पोसणाऱ्या अमेरिकेनं आखातात युद्ध भडकवत इराणमधील तेल रिफायनरीवरच हल्ले केल्यानं आणि हॉमुर्ज सामुद्धधुनी बंद पडल्यानं पाकिस्तान सरकारचं पार कबरडं मोडलंय. रमझानच्या महिन्यातच पाकिस्तानला इफ्तार पार्ट्या बंद करण्याचे फतवे काढावे लागण्याची नामुष्की ओढावलीये. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी शाहबाज शरिफ सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय. पाकमध्ये कसा हाहाकार माजलाय पाहा,
पाकिस्तानमध्ये इंधन महागलं(HDR)
युद्धामुळे इंधनाच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या
पेट्रोल सुमारे 321.17 रुपये प्रति लिटर
डिझेल तब्बल 335.86 रुपये प्रति लिटर
पाकिस्तानात गॅस सिंलेडर मिळेनासे
दुसऱ्याच्या भांडणात पाकिस्तान अवस्था भीक नको पण कुत्रं आवर अशी झालीये. आता हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आणि लॉकडाऊन लागत असलेल्या पाकला सावरण्यासाठी गोंधळलेल्या शहबाज सरकारनं उच्चस्तरिय बैठक बोलावून पाकला पुन्हा भिकेला लावण्याचा इरादा पक्का केलाय. नेमके त्यांनी काय निर्णय घेतले ज्यामुळे पाकचे नागरिक हैराण झाले ते पाहा,
युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन
इंधन संकटामुळे पाकिस्तानमध्ये २ आठवडे शाळा बंद
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम,
सरकारी कार्यालय आठवड्यातून ४ दिवसच सुरू राहणार
सरकारी वाहनांच्या इंधन भत्त्यांमध्ये 50% कपात
60% सरकारी वाहनं 2 महिने रस्त्यावर धावणार नाही
सर्व खासदारांच्या मासिक पगारात 25% कपात, मंत्री 2 महिने पगार घेणार नाहीत.
इतकंच नाही तर नेत्यांचे परदौश दौरे रद्द करण्यात आलेत
जगात असा एकही देश नसेल ज्यांच्याकडून पाकिस्ताननं कर्ज घेतलेलं नसेल. त्यामुळे आधीच चुकीच्या ऊर्जा धोरणांनी पाकिस्तानला कर्जाबाजारी केलंय, असं खुद्द आयएमएफनं म्हटलं होतं. तेल आणि वायूसाठी आखाती देशांवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानात गँस बंद झाल्यानं सरकारची हवा टाईट झालीये. आंतराष्ट्रीय पातळीवर झालेली नामुष्की आणि नागरिकांचा सरकारविरोधातील रोष पाहता पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष झाला तर नवल वाटायला नको.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.