Madam N Pakistani Female Spy x
देश विदेश

Pakistani Female Spy : पाक सैन्याची महिला दहशतवादी, मॅडम N चा फाटला बुरखा; भारतात 500 गुप्तहेरांचे नेटवर्क?

Pakistani Spy Network In India : भारताकडून पाकिस्तानतील दहशतवाद्यांचा खात्मा केला जातोय. तर दुसरीकडे आता पाकमधील पहिली महिला दहशतवादी मॅडम N हिचे नवे कारनामे समोर आलेत. कोण आहे ही मॅडम N? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

भारतावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांना आता भारतात दहशतवादी कारवायांसाठी महिलांची मदत घ्यावी लागल्याचं समोर आलंय. भारताच्या सखोल तपासात ISI एजंट असणाऱ्या मॅडम N चा बुरख्याआड लपलेला खरा क्रूर चेहरा आता उघडा पडलाय. तिच्या दिलखेचक अदांनी हेरांना आणि घातक कृत्यांनी भारतीयांना घायाळ केलंय. ही मॅडम N कोण पाहा...

कोण आहे मॅडम N

- मॅडम Nचं खरं नाव नौशाबा शहजाद मसूद

- पाक हेर तिला ‘मॅडम N’ म्हणून संबोधतात

- मॅडम Nचा लाहोरमध्ये ट्रॅव्हल आणि टूरिझमचा व्यवसाय

- मॅडम Nचा नवरा पाक सिव्हिल सर्व्हिसचा निवृत्त अधिकारी

पाकिस्तानच्या लाहोर मध्ये जैयाना ट्रॅव्हल अँड टूरिझम नावाची कंपनी थाटून या दहशतवादी महिलेनं भारताच्या अंतर्गत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर नेमण्याचं पाप केलंय. होय. आता आत्मविश्वास हरवलेल्या असीम मुनीरच्या सेनेला भारताविरुद्धच्या कट कारस्थानात महिलांची मदत घ्यावी लागलीये. या महामायेनं बुरख्याआडून भारताच्या विरोधात काय केलंय. पाहा..

मॅडम N चे कारनामे

- भारतात 500 ‘स्लीपर सेल’ गुप्तचरांचे नेटवर्क उभारण्याचा कट

- भारतातील हिंदू आणि शीख समुदायांतील इन्फ्ल्यूएन्सर लक्ष्य

- इन्फ्ल्यूएन्सरला पाकिस्तानात प्रवेश करण्यास मदत

- पाकिस्तानात बोलवून ISI आणि पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांशी थेट भेट घडवून आणायची

- इन्फ्ल्यूएन्सरला हेरगिरीच्या जाळ्यात अडकवायची

- यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंगच्या चौकशीत तिचं नाव समोर

मॅडम N ची ट्रॅव्हल एजन्सी पाकिस्तानच्या इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड सोबत मिळून शीख आणि हिंदू तीर्थयात्रांना सुविधा पुरवते. त्यामुळे तिची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासापर्यंत पोहोच असल्याच समोर आलंय. ती फक्त एका फोन कॉलवर कोणालाही व्हिसा मिळवून देऊ शकत होती. मॅडम N पाकिस्तानी दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी सुहैल कमर आणि काउन्सिलर उमर शरयार यांच्या सतत संपर्कात होती . तसंच पाकिस्तानी दूतावासात व्हिसा अधिकारी असलेल्या आणि ISI संबंधित असलेल्या दानिश उर्फ एहसान-उर-रहमान यांच्याशीही तिचा संपर्क होता. यामुळे पहेलगाम हल्ल्यात पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सरळसरळ सहभाग असल्याचंही स्पष्ट झालाय. म्हणूनच आता दहशतवाद्यांना अद्दल घडवल्यानंतर या पाकच्या अधिकाऱ्यांना, मुनीरच्या हेरांना आणि आपल्याच फितुरांना सरकार कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT