पाकिस्तानात एका महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार
९ सप्टेंबर २०२० रोजी घडली घटना
आरोपींना काही तासांत बेड्या
न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Pakistan Lahore Motarway Women Rape Case पाकिस्तानात एक संतापजनक घटना घडली. एका महिलेवर तिच्याच पोटच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. सदर घटना पाकिस्तनाच्या लाहोर भागात घडली असून या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. पाकिस्तानी वंशाची एक फ्रेंच महिला आपल्या तीन मुलांसह सियालकोट-लाहोर मोटरवेवरून प्रवास करत होती. रात्री उशिरा तिच्या वाहनातील पेट्रोल संपल्याने ती महामार्गाच्या कडेला कारमध्येच थांबली होती. त्यावेळेस तिच्यासोबत तिची लहान मुलं देखील होतील. याचदरम्यान काही तरुणांनी येऊन महिलेच्या कारची तोडफोड केली.
त्यानंतर आरोपींनी महिलेला कारच्या बाहेर खेचून, तिचे कपडे फाडत तिच्याच मुलांसमोर बलात्कार केला. पीडित महिला वेदनेने कळवळत होती, मात्र निर्दयी नराधम तिच्यावर अत्याचार करत राहिले. दुसरीकडे महिलेची मुलं घाबरून कारमध्ये रडत होती. आपल्याला आईला वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. काही तासानंतर आरोपींनी महिलेची सुटका केली आणि गाडीत असलेले दागिने, पैसे घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. काही तासांतच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणातील दोन दोषी आबिद अली आणि शफकत अली यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मार्च २०२१ मध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) दोन्ही आरोपींना सामूहिक बलात्कार, अपहरण, दरोडा आणि दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच जन्मठेप आणि इतर कारावासाच्या शिक्षाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, ३ जून २०२६ रोजी लाहोर उच्च न्यायालयाने दाखल केलेला जामीन फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. या निर्णयाचे सगळ्या स्तरावरून कौतुक केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.