पाकिस्तान मधील बलुचिस्तानात भीषण स्फोट Saam Tv
देश विदेश

पाकिस्तान मधील बलुचिस्तानात भीषण स्फोट

पाकिस्तानात भीषण स्फोटामध्ये ५ पोलिसांचा मृत्यू झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इस्लामाबाद : पाकिस्तानात Pakistan भीषण Awful स्फोटामध्ये Explosion ५ पोलिसांचा Police मृत्यू झालेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडे असलेले बलुचिस्तान Balochistan प्रांताची राजधानी क्वेटा Quetta या शहरामध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की यामध्ये ५ पोलिसांचा मृत्यू झाले आहे, तर एकूण १२ जण गंभीर जखमी झाले आहे.

यामध्ये ८ पोलिसांचा समावेश आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. प्राथमिक अंदाजानुसार बॉम्ब Bomb हे एका मोटार बाईकमध्ये लावण्यात आलेला होता. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शेहवानी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ८ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. तसेच २ नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी पोलीस गाडीला लक्ष्य करण्यात आले होते.

हे देखील पहा-

गाडी क्वेटामधील सेरेना हॉटेलजवळ तंझीम स्क्वेरजवळ येऊन थांबली होती, त्यावेळेस हा स्फोट झाला आहे. सुरक्षा दलांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. जवळील परिसरामध्ये घेराबंदी करण्यात आली आहे. स्फोटामध्ये आजुबाजूच्या इमारतींच्या काचा वगरे फुटले आहेत. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. पण, बलूच कार्यकर्ते या प्रांतात सक्रिय आहेत आणि त्यांनी अनेकदा सुरक्षा दलांवर हल्ला केलेला आहे. बलूच कार्यकर्त्यांचा राग हा केंद्र सरकारवर आहे.

केंद्र सरकार प्रांतामधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करत असल्याचे आरोप आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जम कमल खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांना प्रांताची शांतता नष्ट करायची आहे, पण ते या प्रयत्नामध्ये कधीही यशस्वी होणार नाही, असे ते तयावेळी म्हणाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटासाठी IED चा वापर करण्यात आलेला होता. देशभरात नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊले उचलण्याची मागणी आता केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT