War Exercise In Rajasthan 
देश विदेश

Pahalgam Attack: एलओसीवर गोळीबार; भारताच्या युद्ध अभ्यासाने पाकिस्तान गांगरला

War Exercise In Rajasthan: दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झालाय. मात्र पाकड्यांची मुजोरी काही कमी व्हायला तयार नाही. पाकड्यांनी पुन्हा गोळीबार करत कुरापत काढलीय.. नेमकं सीमेवर काय घडलं? आणि भारताने पाकड्यांना कसं उत्तर दिलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची नांगी ठेचण्याचा संकल्प केलाय. राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचा युद्ध अभ्यास सुरु आहे. तर राफेल आणि सुखोई विमानांचा 'आक्रमण अभ्यास' आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारतीय हवाई दलाच्या युद्ध अभ्यासामुळे कराचीसह पाकिस्तान नेस्तनाबुत होण्याची भीती पाकिस्तानला सतावतेय. त्यातच दगाबाज पाकड्यांनी पुन्हा एलओसीवर गोळीबार करत आपली लायकी दाखवून दिली.

भारतानंही शत्रुला चोख प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीही सीमेवर दाखल झालेत. त्यामुळे पाकड्यांना जन्मभराची अद्दल घडवण्याचा निर्धारचं आता भारतानं केलाय..आणि हीच युद्धाची नांदी ठरू शकते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत- पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढलाय. पाकिस्तानने एलओसीवरील सैन्य वाढवलंय. पाकिस्तानने सैन्याला बंकरमधून भारतावर नजर ठेवण्याची आदेश दिलेत.

रावळपिंडी हेडक्वार्टरला अर्लंट राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. मात्र पाकड्यांनी कितीही उड्या मारल्या तरीही भारताच्या ताकदीपुढे ते निष्प्रभ ठरणार हे निश्चित आहे. समोरासमोर युद्ध करण्याची धमक नसलेल्या पळपूट्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसून पहलगाम हल्ला घडवून आणला हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताकडून होणाऱ्या कारवाईचा धसका पाकिस्तानने घेतलाय.

एलओसीवर गोळीबार करत पाकिस्तानने आपला नापाक मनसूबा दाखवून दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम कराराबाबत प्रश्न उपस्थित होतायेत. भारत हा करार रद्द करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून द्यावी असा सूर देशभरातून उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT