Padma Awards : डॉ.सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर SaamTvNews
देश विदेश

Padma Awards : डॉ.सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर

"मित्रा, तुझा अभिमान वाटतोय" शरद पवार यांनी ट्वीट करत पूनावाला यांना शुभेच्छा दिल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून अतिशय प्रतिष्ठित आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. देशभरातून विविध क्षेत्रातल्या 128 दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १० दिग्गजांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला असून सायरस पुनावाला यांना याआधी वैद्यक क्षेत्रातल्या योगदानासाठी २००५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील मानकरी :

पद्मविभूषण

प्रभा अत्रे

पद्मभूषण

सायरस पुनावाला
नटराजन चंद्रशेखरन

पद्मश्री

विजयकुमार डोंगरे
डॉ. हिम्मतराव बावस्कर
सुलोचना चव्हाण
सोनू निगम
अनिल कुमार राजवंशी
बालाजी तांबे (मरणोत्तर)
भिमसेन सिंघल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

SCROLL FOR NEXT