Physical assaulted by three Saam Tv News
देश विदेश

निर्जनस्थळी नेलं अन् सामूहिक अत्याचार, पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं? | Crime

Physical assaulted by three: निर्जनस्थळी नेऊन आधी बलात्कार नंतर अंगावर पेट्रोल ओतून पीडितेला जाळण्याचा प्रयत्न. ही हादरवणारी घटना ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील बयाबर गावातून उघडकीस आली.

Bhagyashree Kamble

निर्जनस्थळी नेऊन आधी बलात्कार नंतर अंगावर पेट्रोल ओतून पीडितेला जाळण्याचा प्रयत्न. ही हादरवणारी घटना ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील बयाबर गावातून उघडकीस आली. हा खळबळजनक प्रकार शनिवारी घडला. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना तिला अडवून हा अमानुष प्रकार करण्यात आला. या हल्ल्यात पीडित मुलगी जवळपास ७० टक्के भाजली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पुरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी मुलीला आधी जबरदस्ती निर्जनस्थळी नेलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी पेट्रोल ओतून पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच मुलीला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी ७० टक्के भाजली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर तिघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "अशा घटना प्रशासनाच्या पूर्ण अपयशाचे चित्र दर्शवतात. ओडिशात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. १५ वर्षीय मुलीसोबत जे घडलं, ते अत्यंत संतापजनक होतं", असं ते म्हणाले. सध्या या घटनेची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT