Andhra Pradesh ONGC Employee Killed His Sons AI Photo
देश विदेश

Shocking News : २ निरागस मुलांना पाण्यात बुडवून मारले, नंतर बापाने स्वत: आयुष्य संपवले, हत्याकांडाचे कारण वाचून धक्का बसेल

Andhra Pradesh ONGC Employee Killed His Sons : ३७ वर्षीय व्यक्तीने पोटच्या दोन पोरांना पाण्यात बुडवून मारून टाकले. त्यानंतर स्वत: आत्महत्या करत आयुष्य संपवले. या प्रकारानंतर काकीनाडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Andhra Pradesh ONGC Employee Killed His Sons : शाळेत कमी मार्क्स पडले म्हणून संतापलेल्या बापाने पोटच्या दोन पोरांचा जीव घेतला. ओएनजीसीमध्ये कार्यरत असणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडवून जीव घेतला. त्यानंतर स्वत: आत्महत्या करत आयुष्य संपवले. पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट मिळाली आहे. ही भयंकर घटना समजताच आंध्र प्रदेशमधील काकीनाडामध्ये एकच खळबळ उडाली आहे. चंद्र किशोर असे आत्महत्या करणाऱ्या एएनजीसीच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. शाळेत मुलांना कमी गुण मिळाले म्हणून बापाने टोकाचे पाऊल उचलले.

नेमकं प्रकरण काय आहे?

व्ही चंद्र किशोर ONGC मध्ये कार्यरत होते. त्यांना दोन मुलं होती. त्यामधील एकाचं वय सहा आणि दुसऱ्याचं वय सात होतं. चंद्र किशोर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे खूप चिंतेत राहत होते. मुलं चांगली शिकली नाहीत, तर पुढे जाऊन त्यांचं काय होणार? याची चिंता त्यांना वारंवार होती. जर चांगलं शिक्षण नाही झालं, तर मुलांना आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, त्यामुळे चंद्र किशोर चिंतेत राहायचे. त्यामुळे मुलांना वारंवार मारहाण आणि टोमणे मारत राहायचे. शुक्रवारी मुलांच्या शाळेतील गुण समोर आल्यानंतर किशोरला राग अनावर आला. त्यानं दोन्ही मुलांना पाण्यात बुडवून मारले. त्यात त्यांचा जीव गेला. त्यानंतर चंद्र किशोर यांनाही आयुष्य संपवले.

बापानेच घेतला पोरांचा जीव -

चंद्र किशोर यानं मुलांना पाण्याचा बादलीमध्ये बुडवून मारले. त्यानंतर स्वत: फाशी घेत आयुष्य संपवले. पत्नी राणीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. दोन्ही मुलाचे मृतदेह बादलीत होते, नवऱ्याला बेडरूमध्ये फासावर लटकवल्याचे पाहिल्यानंतर राणी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करण्यात येत आहे.

सुसाईड नोट मिळाली ?

पोलिसांना घटनास्थळावरून किशोर चंद्र यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये किशोर यांनी मुलाच्या शिक्षणाबद्दलची आपल्या मनातील भीती व्यक्त केली आहे. पोलिसांकडून सुसाईड नोटची तपासणी केली जात आहे, फॉरेन्सिक पथकाकडे पाठवण्यात आली आहे. घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा करण्यात आले असून पोलिसांकडून याप्रकरणाचा सर्व अंगाने तपास केला जात आहे.

नोट - आत्महत्या हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. टोकाचे पाऊल उचलण्याआधी आपल्या प्रिय लोकांबद्दल विचार करायला हवा. आत्महत्या रोखण्यासाठी, सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. २४ तास १४४१६ या क्रमांकावर फोन करून मदत घेऊ शकता. सरकारकडून १३ भाषांमध्ये हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्याआधी हजारवेळा विचार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT