FB Live करत नवऱ्याने पिलं विष; अडवायला गेलेल्या पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक  Saam TV
देश विदेश

FB Live करत नवऱ्याने पिलं विष; अडवायला गेलेल्या पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक

Facebook लाईव्हवरती राजीव तोमर यांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. नवरा विष पिल्याचं पाहीले पतीला अडवेपर्यंत त्याने विष पिल्याचे पाहून पत्नीनेही त्या पुडीमधील राहीलेले विष पिलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्‍तर प्रदेश : उत्‍तर प्रदेशातील (UP) बागपतमध्ये एका व्यक्तीने फेसबूक लाइव्हव करत विष पिलं आहे तर त्या व्यक्तीने विष पिताना त्याला अडवायला गेलेल्या त्याच्या पत्नीनेही विष पिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बरौतच्या कासिमपूर खेडी गावात राहणारे राजीव तोमर हे गेल्या पाच वर्षांपासून पत्नी पूनम आणि मुलं विपुल, रिदम यांच्यासह सुभाष नगरमध्ये राहतात. त्यांचे एक चपलांचे दुकान आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायात मंदी आल्याने आणि खर्च भागविण्यासाठी घतलेले कर्ज फेडता न आल्याने राजीव तोमर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र फेसबुक लाईव्हवरती (Facebook Live) राजीव तोमर यांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. नवरा विष पिल्याचं पाहीले पतीला अडवेपर्यंत त्याने विष पिल्याचे पाहून पत्नीनेही त्या पुडीमधील राहीलेले विष पिले दरम्यान या दोघा पती-पत्नीला रुग्णालयात नेले असता पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT