Jammu and Kashmir CM Face Saam tv
देश विदेश

Jammu and Kashmir CM Face : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला दणका, काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार; मुख्यमंत्र्यांचं नावही ठरलं

Jammu and kashmir news : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला मोठं यश मिळालं आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळताच आघाडीने मुख्यमंत्र्यांचं नावही देखील ठरवलं आहे.

Pramod Subhash Jagtap

jammu kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. तर काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला मोठला मोठं यश प्राप्त झालं आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. याचदरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्र्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला यश मिळताच त्यांनी मुख्यमंत्र्यांचही नाव देखील जाहीर केलं आहे.

ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे. तर केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसलं आहे, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले. लोकांनी आपला जनादेश स्पष्ट दिला आहे, असेही फारुक यांनी सांगितलं.

'लोक कलम ३७० हटवण्याच्या विरोधात होते. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांचे आभार. त्यांना स्वतंत्र्यरित्या मतदान केलं. त्यांनी निवडलेलं सरकार लोकांच्या समस्या दूर करेल. आता बेरोजगारी कमी करायची आहे. तसेच महागाई देखील कमी करण्याचा प्रयत्न राहील. आता ९० विधानसभा मतदारसंघातक आमदार लोकांसाठी काम करतील, असे त्यांनी जाहीर केले.

बडगाम विधानसभा मतदारसंघावर ५८.९७ टक्के मतदान झालं. १९७७ सालापासून हा विधानसभा मतदारसंघ नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी बडगामबरोबर गांदरबलमधूनही निवडणूक लढवली. दोन्ही मतदारसंघात ओमर हे आघाडीवर आहेत. गांदरबल विधानसभा मतदारसंघातून अब्दुल्ला हे ९७६६ मतांनी आघाडीवर आहेत. तर याच मतदारसंघात पीडीपी उमेदवार बशीर अहमद मीर हे पिछाडीवर आहेत.

दरम्यान, ओमर उब्दुल्ला यांची एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अब्दुल्ला यांनी त्यांची टोपी काढली. त्यानंतर म्हणाले की, आता आमची अब्रु तुमच्या हातात आहे. तसेच त्यांनी निवडणुकीत प्रचार करताना पीडीपी आणि भाजपवर टीका केली. पीडीपीने भाजपसोबत जाऊन लोकांचा विश्वासघात केला, असं लोकांच्या मनात बिंबवण्यात ओमर अब्दुल्ला यशस्वी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT