Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike: लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

What is the Cost of 1 Gram of Gold: ऐन लग्नसराईत अनेकांचा कल हा सोनं-चांदी खरेदीवर असतो.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. ऐन लग्नसराईत अनेकांचा कल हा सोनं-चांदी खरेदीवर असतो.

मात्र बुधवारी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची (Gold) किंमत (Price) 55,700 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,760 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 766 रूपये आहे.

1. जाणून घेऊया तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

चेन्नई - 61,420 रुपये

दिल्ली - 60,910 रुपये

हैदराबाद - 60,760 रुपये

कोलकत्ता - 60,760 रुपये

लखनऊ - 60,910 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,760 रुपये

पुणे (Pune) - 60,760 रुपये

नागपूर - 60,760 रुपये

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉलर गेल्या सत्रातील सर्वोच्च शिखरावर गेल्याने मंगळवारी सोने मुख्य $2,000 च्या वर चढले, तर व्यापार्‍यांनी भविष्यातील व्याजदर वाढीच्या संकेतांसाठी बुधवारच्या यूएस चलनवाढीच्या डेटाचा विचार केला.

स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी वाढून $2,005.79 प्रति औंस झाले तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून $2,019.00 वर स्थिरावले.

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT