Odisha Train Accident Saam TV
देश विदेश

Odisha Train Accident Live Updates : रेल्वे अपघाताला जबाबदार दोषींवर कारवाई होणारच; PM मोदींची प्रतिक्रिया

Odisha Train Accident Live Updates : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओदिशा रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी दाखल झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशात अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाला रवाना, घटनास्थळी जाऊन परिस्थिताचा आढावा घेणार

रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 261 वर

दुर्घटनास्थळाचा ड्रोन व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा रेल्वे दुर्घटनास्थळी भेट देणार

बालासोर रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली आहे.

ओदिशा अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 238 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना गोपालपूर, खंटापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दुर्घटनास्थळी दाखल

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दुर्घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांशी बातचित करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

रेल्वेचा काही किलोमीटरचा ट्रॅक गायब

अपघातस्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. अपघाताची अनेक वेदनादायक चित्रे समोर येत आहेत. टक्कर एवढी भीषण आहे की, रेल्वेचा काही किलोमीटरचा ट्रॅक गायब झाला आहे. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

भाजपचे देशभरातील सर्व कार्यक्रम रद्द

ओदिशा रेल्वे अपघातावर शोक व्यक्त करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, भीषण रेल्वे अपघात अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे. या हृदयद्रावक घटनेने मी दु:खी झालो आहे. केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात आयोजित आजचे सर्व कार्यक्रम स्थगित केले जाणार आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री घटनास्थळी दाखल 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओदिशा रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी दाखल झाले आहे.

ओदीशातील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Odisha Train Accident Live Updates: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली.

कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. मिळालेल्या माहितीनुसार सात डबे उलटले, चार डबे रेल्वे हद्दीबाहेर गेले. एकूण 15 डब्बेर रुळावरून घसरले आहेत. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT