Stampede in Odisha Saam Tv
देश विदेश

Stampede in Odisha : मकर संक्रातीच्या मेळाव्यात चेंगराचेंगरी; २ जण ठार, लहान मुलांसहित १२ जखमी

ओडिशात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Stampede in Odisha : ओडिशातून चेंगराचेंगरीचं वृत्त हाती आलं आहे. ओडिशाच्या कटकमध्ये मकर संक्रातीच्या मेळाव्यादरम्यान बदांबा-गोपीनाथपूर टी-ब्रिजवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या मकरसक्रांतीच्या मेळाव्याला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. मकर संक्रातीच्या मेळाव्यात ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर लहान मुलांसहित १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ओडिशाच्या कटक येथील बदांबा-गोपीनाथपूर टी-ब्रिजवर मकर संक्रातीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेतील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT